Nandurbar| दुष्काळाचं संकट, शेतकऱ्यानं 60 एकरवरील बागेवर फिरवला रोटाव्हेटर;कवठळमधील शेतकऱ्याची व्यथा

नंदुरबारमध्ये दुष्काळाचं भीषण संकट आहे. आठ महिने जपलेल्या उभ्या पिकांवर पावसाअभावी रोटाव्हेटर फिरवण्याची वेळ इथल्या शेतकऱ्यावर आलीय. शहादा तालुक्यातील कवठळ येथील प्रगतशील शेतकरी विनोद जाधव पाटील यांनी पाण्याअभावी आपल्या शेतातील ऊस, पपई आणि केळीच्या बागेवर रोटाव्हेटर फिरवला. तब्बल ६० एकर शेतीवर रोटाव्हेटर फिरवलाय. पिकं वाचवण्यासाठी त्यांनी बोअरवेल काढल्या मात्र त्यांनाही पाणी न लागल्यानं ते आर्थिक संकटात सापडलेत.

संबंधित व्हिडीओ