नंदुरबार जिल्ह्यात अनेक दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पाऊस तसेच दगड वातावरणामुळे व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली लाल मिरचीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे... शेतकऱ्यांकडून ओली लाल मिरचीची खरेदी करून व्यापारी पथारीवर मिरची सुकवण्यासाठी वाडवण्यात येत असते, मात्र मागील आठवड्याभरापासून होत असलेल्या अवकाळी पाऊस तसेच सततच्या ढगाळ वातावरणामुळे मिरचीची गुणवत्ता घसरत असल्याने व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे तसेच ज्याप्रमाणे शासन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई करत असते त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांसाठी देखील नुकसान भरपाईची सुविधा उपलब्ध करून द्यावे अशी मागणी व्यापारी वर्ग करून केली जात आहे.