माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांचा ७४ वा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. यानिमित्त आज सायंकाळी 6 वाजता कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानावर भव्य वाढदिवस सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री जयकुमार गोरे,यांच्यासह अनेक मंत्री, मंत्री राधाकृष्ण विखेपाटील,आमदार उपस्थित राहणार आहेत.