Nashik | शेतात साठलेल्या गुडघाभर पाण्यातून NDTV मराठीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद

नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागात रात्रीच्या सुमारास अतिवृष्टी झाल्याने येवल्यासह चांदवड तालुक्यातील अनेक गावांमध्ये मुसळधार पावसानं अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झालीय. काढणीला आलेला मका, बाजरी, सोयाबीन ,तूर पिकांचं मोठं नुकसान झालंय. प्रमुख नगदी पीक असलेल्या कांदा पिकांसह कांद्याची रोपं आणि भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय.शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या घास आस्मानी संकटाने हिरावून नेला.त्यामुळे बळीराजा हतबल झाला आहे. शेतात साठलेल्या गुडघाभर पाण्यातून आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी आढावा घेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधलाय ...

संबंधित व्हिडीओ