नाशिक जिल्ह्यात काल पावसाने अक्षरश: हाहाःकार उडलाय. पावसाचा सर्वाधिक फटका कांदा पिकाला बसलाय. चांदवड, नांदगाव,येवल्यासह नाशिक जिल्ह्यातील पूर्व भागातील कांदा हे नगदी पिक म्हणून ओळखले जाते. मात्र पावसाने नवीन लागवड केलेला तर काही ठिकाणी काढणी आलेला लाल कांद्याचं मोठे नुकसान झालंय वार्षिक आर्थिक घडी कशी बसवावी असा प्रश्न कांदा उत्पादकांना पडला आहे.मनमाड जवळच्या शिंगवे परिसरातून कांदा पिकांच्या नुकसानीचा आढावा घेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा व्यथा जाणून घेतल्याहेत आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी