'फक्त हिंदूंकडूनच दिवाळीची खरेदी करा' या कट्टर हिंदुत्ववादी वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार संग्राम जगताप यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांचे हे वादग्रस्त विधान पक्षाच्या 'शिव-शाहू-फुले-आंबेडकर' विचारधारेला छेद देणारे ठरत असल्याचा उल्लेख नोटीसमध्ये आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जगताप यांना खुलासा करण्यास सांगितले आहे.