छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुल समितीच्या खात्यातील एकवीस पूर्णांक एकोणसाठ कोटींच्या घोटाळा प्रकरणात एक नवीन खुलासा समोर आला आहे. वेळ मल्टervices या कंपनी कडनं कंत्राटी ऑपरेटर म्हणून क्रीडा विभागात कार्यरत मुख्य आरोपी हर्षकुमार अनिल क्षीरसागर याला तेरा हजार रुपये पगार मिळाल मात्र हा घोटाळा केल्यावर हर्षकुमारनं आपण काम करत असलेल्या कंपनीच्या व्यवस्थापकाच्या खात्यावर तब्बल ऐंशी लाख रुपये ऑनलाईन वळवले होते. हा व्यवहार समोर येताच व्यवस्थापक नागेश डोंगरे याला अटक करण्यात आली या सगळ्या प्रकरणातील डोंगरे हा पाचवा आरोपी ठरलेला आहे.