मराठीच्या वादावरून शिवसेना विरुद्ध मनसे आता थेट रस्त्यावर लढाई सुरू झालीय, शिवसेनेचे नेते संजय निरूपम यांनी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी सक्ती करण्याला विरोध केला आणि परप्रांतीय त्यासाठी रिक्षा चालकांच्या भेटीला दहिसरमध्ये दाखल झाले, पण इथे मनसैनिकांनी निरुपम यांना जोरदार विरोध केला इतकंच काय तर मनसैनिकांकडून संजय निरूपम यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली, दगडफेक करणाऱ्या मनसैनिकांची पोलिसांनी धरपकड करत चांगलाच चोप दिला, इतकंच नाही तर मनसैनिकांनी गाडीची हवा देखील काढली...