'जमीन आमची, निर्णय आमचा', शेतकऱ्यांची भूमिका; Gadchiroli च्या चार्मोशीत शेतकऱ्यांचा ठिय्या

गडचिरोलीच्या चामोर्शी तालुक्यात प्रस्तावित एमआयडीसी रद्द करण्याच्या मागणीसाठी हजारो शेतकरी आपल्या कुटुंबियांसह गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. बैलगाड्या, ट्रॅक्टर तसेच पायी मोर्चाच्या माध्यमातून आलेल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाला केलंय... एमआयडीसीसाठी सुपीक शेतीजमीन संपादित करण्यास विरोध करत शेतकऱ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. "जमीन आमची, निर्णय आमचा" अशी भूमिका घेत शेतकऱ्यांनी प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली. या संपुर्ण परिस्थितीचा आढावा आमचे प्रतिनिधी मनिष रक्षमवार यांनी घेतलेला आहे...

संबंधित व्हिडीओ