पालघर जिल्ह्याला गेल्या काही दिवसांपासून पुन्हा परतीच्या पावसाने झोडपले आहे... यापूर्वी पावसामूळे खरिपाचे पीक वाया गेले आहे... आता परतीच्या पावसाने शेतात कापून ठेवलेले पीक शेतातच तरंगू लागले आहे... तसेच खळ्यावर साठवलेले पीक भिजून ओले झाले आहे... त्यामुळे शेतकऱ्यांवर एकाच खरीप हंगामात दुबार अस्मानी संकट कोसळले आहे... पालघर जिल्ह्यात खरिपाचे एक लाख सात हजार हेक्टर क्षेत्र आहे... यामध्ये ७६ हजार हेक्टर सर्वाधिक क्षेत्र भातपिकाचे आहे. या मुख्य पिकावरच शेतकऱ्यांना आपल्या कुटुंबाची वर्षभर गुजराण करावी लागते आहे. यावर्षी सततच्या पावसाने खरिपाचे उभे पीक आडवे झाले आहे.