Palghar| मासवण आश्रमशाळेच्या जेवणात किडे,दोन मुलांचा संशयास्पद मृत्यूही;विद्यार्थ्यांनी मांडली व्यथा

पालघरच्या मासवण आश्रमशाळेत दोन विद्यार्थ्यांचा संशयास्पद मृत्यू आणि सुमारे ३५ विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असतानाच आश्रमशाळेतील गैरसोयींचा पर्दाफाश झाला आहे. विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कच्चं जेवण, पाणचट डाळ, कच्च्या चपात्या आणि नाश्त्यात किडे आढळत असल्याचा आरोप करण्यात आलाय. याशिवाय थंडीच्या दिवसांतही विद्यार्थ्यांना पहाटे गार पाण्याने अंघोळ करावी लागते, तर मुलींना सॅनिटरी पॅड्सही उपलब्ध करून दिले जात नसल्याची तक्रार केली आहे. आजारी विद्यार्थ्यांना योग्य उपचार न देता केवळ गोळ्या देऊन हॉस्टेलमध्ये पाठवले जात असल्याचाही गंभीर आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. या विद्यार्थ्यांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी पाहूया..

संबंधित व्हिडीओ