धुळ्यात पांझरा नदीला पूर! धुळे शहरासह जिल्ह्यासाठी 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. साक्री तालुक्यात झालेल्या पावसामुळे अक्कलपाडा धरणातून तब्बल १० हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग पांझरा नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. यामुळे नदीची पातळी वाढून शहरातील फरशी पूल पाण्याखाली गेला आहे आणि वाहतूक बंद झाली आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.