मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आता राजकीय टोलेबाजी रंगू लागली आहे. बीडमध्ये महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारसभेत मंत्री पंकजा मुंडे यांनी आमदार सुरेश धस यांना जोरदार टोला लगावला. निवडणुकीत काम केल्यावर काम केलं म्हणा, नाहीतर निवडून आल्यावर भाषण करताना एका मिनिटात यांनी आमचं काम केलं नाही, असं म्हणू नका. असं पंकजा मुंडे म्हणाल्या. विधानसभा निवडणुकीनंतर आमदार सुरेश धस यांनी पंकजा मुंडेंनी आपलं काम केलं नसल्याची तक्रार पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याचं म्हटलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंनी हा टोला लगावलाय.
'Don't say that no work was done after getting elected' — Pankaja Munde's jibe at Suresh Dhas | NDTV Marathi