सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान धक्कादायक घटना घडली.. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर कोर्टात हल्ल्याचा प्रयत्न झाला.. सुप्रीम कोर्टात वकिलानं सुनावणीदरम्यान बूट फेकण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वकिलाला वेळीच रोखलं.. वकिलाने सुनावणी दरम्यान मंचाच्याजवळ जाऊन बूट काढून फेकण्याचा प्रयत्न केला. पण वेळीच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला अडवत कोर्टाबाहेर काढलं.. दरम्यान, आता सुप्रीम कोर्टाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलीय.. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल्याच्या प्रयत्न झाला.. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरन्यायधीश गवईंना फोन करत त्यांची विचारपूस केलीय. गवईंवरील हल्ल्याच्या प्रयत्नानंतर देशभरातून निषेध व्यक्त केला जातोय.. त्यातच आता मोदींनीही निषेध केलाय..