पुणे पोलिसांनी गणेश पेठेतील नागझरी नाल्यावर सुरू असलेल्या बेकायदेशीर मासळी बाजारावर मोठी कारवाई केली आहे. यामुळे बंडू आंदेकरचा प्रमुख आर्थिक स्रोत बंद झाला असून, त्याचं साम्राज्य धोक्यात आलं आहे. महापालिकेला पत्र लिहून ही कारवाई करण्यात आली. व्यापाऱ्यांनी मात्र कोणतीही पूर्वसूचना न दिल्याची तक्रार केली आहे. रेवती हिंगवे यांनी या कारवाईचा आढावा घेतला आहे.