रशियाने जगातील सर्वात घातक परमाणू क्रूझ मिसाईलची निर्मिती केली आहे, ज्याची मारक क्षमता जवळजवळ 'अमर्याद' आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या मिसाईलने (संभाव्यतः 'ब्युरेवेस्टनिक') परिक्षणादरम्यान सलग १५ तास हवेत राहून तब्बल १४,००० किलोमीटरचा पल्ला गाठला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकत्याच टॉमहॉक मिसाईलबाबत दिलेल्या धमकीला रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दिलेले हे सणसणीत उत्तर मानले जात आहे.