ठाण्याला 'रेड अलर्ट'! सकाळपासूनच ठाणे शहरात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. हवामान विभागाने पुढील तीन तास मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे, तसेच जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला आहे. ठाणे स्टेशनजवळ रेल्वे ट्रॅकच्या आजूबाजूला पाणी साचायला सुरुवात झाली आहे. रेल्वेकडून पाण्याचा निचरा करण्यासाठी सक्शन पंप लावण्यात आले आहेत.