महाविकास आघाडी आणि मनसे पक्षाच्या सत्याचा मोर्च्याच्या आयोजकांवर आणि समन्वयकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आझाद मैदान पोलीस स्थानकात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मोर्चाला परवानगी नसतानाही मोर्चा काढण्यात आला. परवानगी शिवाय इतक्या मोठ्या प्रमाणात जमा जमवल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.