फोडाफोडीच्या राजकारणाला प्रोत्साहन देण्याऐवजी शरद पवार यांनी आता अमेरिकेतील नेते अलोरच्या भूमिकेत जाऊन तरुणांना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन करावं असा सल्लाच उदयनराजे भोसले यांनी दिला आहे. राजकारणातील वरिष्ठ नेते असलेल्या पवारांनी तरुणांना वाव दिला पाहिजे. पवारांनी आता मार्गदर्शन करावं लोकांची प्रगती कशी होईल हा विचार मनात ठेवून काम करावं असं खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलंय.