रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी यावी या निर्णयाला विरोध करण्यासाठी अनेक कामगार नेते सरसावलेयत.यातलं प्रमुख नाव म्हणजे कामगार नेते शशांक राव, मुळचे दक्षिणेतले पण ज्यांची तिसरी पिढी ही महाराष्ट्रात वास्तव्यात आहेत.या शशांक रावांना परप्रांतीय रिक्षा-टॅक्सी चालकांचा इतका पुळका का आलाय असा सवाल आता उपस्थित होतोय.शशांक राव यांनी आजच्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या बैठकीत मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी केली.त्यांच्याशी याच विषयावर बातचित केलीय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी, प्रत्येक मराठी माणसाला शशांक रावांच्या भूमिकेबाबत जे जे प्रश्न पडले असतील ते सगळे प्रश्न आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी विचारलेयत...