Sindhudurg| 8 लाखांचे चोरीला गेलेले मोबाईल शोधून काढले, सायबर पोलिसांची मोठी कारवाई | NDTV मराठी

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सायबर पोलीसांनी १६ ते ३१ मे या कालावधीत राबविलेल्या विशेष मोहीम अंतर्गत केंद्र सरकारने उपलब्ध केलेल्या सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टरच्या माध्यमातून तब्बल ८ लाख ४० हजार रुपये किंमतीचे चोरीस गेलेले अथवा गहाळ झालेले ५४ मोबाईल परत मिळविले आहेत. मिळालेले मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत. दिल्ली, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, हैदराबाद, केरळ वगैरे राज्यातून तसेच महाराष्ट्रातील मुंबई, रत्नागिरी, पालघर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमधून सिंधुदुर्ग पोलीसांनी हे मोबाईल रिकव्हर करुन परत आणलेले आहेत.

संबंधित व्हिडीओ