Sindhudurg| कणकवली रेल्वे स्टेशनजवळ भिंत कोसळली, कामाचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची ठाकरे गटाची मागणी

कणकवली रेल्वे स्टेशनच्या बाहेरील रिक्षा स्टॅन्ड लगतचा छताच्या सिलिंगचा काही भाग आज अचानक कोसळला. कोसळलेली सिलिंगची प्लेट ही वरतीच अडकून लोबकळत राहिली. यामुळे या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हे सिलिंग कोसळल्याची माहिती मिळतात शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट घेत कामाच्या निकृष्ट कामाच्या दर्जाची चौकशी करण्याची मागणी केली. या संपूर्ण कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी देखील शिवसेना ठाकरे गटाने केली आहे.

संबंधित व्हिडीओ