अमेरिकेत स्थलांतरितांविरोधात कारवाई जितकी कठोर होतेय. तितकाच कडक विरोध या कारवाईला होतोय. लॉस एंजेलिसमध्ये तर स्थलांतरितांविरोधात कारवाई करणारी ICE आणि आंदोलकांमध्ये जोरदार झ़टापट झाली. लॉस एंजेलिसमध्ये आयसीईनं धडक कारवाई करत स्थलांतरितांना अटक केली त्यानंतर वातावरण अधिक चिघळलं. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली, डिटेन्शन सेंटरबाहेर काही इमारतींचं नुकसानही केलं तर पोलिसांनी परिस्थिती चिघळताच लाठीमार करत काही आंदोलकांना ताब्यात घेतलं. नेमकं काय घडतंय, स्थलांतरितांवरील कारवाई कुठवर आलीय पाहूया एक रिपोर्ट....