भाजपचे आमदार सुरेश धस आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्यातील वाद आता चव्हाट्यावर आलेत. पंकजांनी माझ्या विरोधात प्रचार आणि कामं केली असा आरोप सुरेश धस यांनी केलाय. आणि या विरोधात पंकजा मुंडेंवर कारवाईची मागणी करत पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार असंही धस म्हणाले.