मुंबईच्या अंधेरी भागात माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. रात्री रस्त्यावरचा भटका श्वान भुंकत असल्याचा त्रास होत असल्यामुळे एका इमारतीतील व्यक्तीने त्याच्यावर एअरगनने गोळीबार केला आहे. या गोळीबारात तो श्वान जखमी झाला असून गोळीबार करणारे आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे.