शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय बारामती अभ्यागत मंडळावर खासदार सुप्रिया सुळे यांच्या ऐवजी आता खासदार सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करण्यात आलीये...२०२१ साली महाविकास आघाडी सरकार असताना सदर मंडळावर सुप्रिया सुळे यांची नियुक्ती करण्यात आली होती..राज्यातील सरकार बदलल्यानंतर आता सुळे यांच्या ऐवजी सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या खात्याचा निर्णय आहे..