अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवरील आयात शुल्क ५० टक्क्यांपर्यंत वाढवण्याच्या घोषणेनंतर, अमेरिकेच्या सीमाशुल्क आणि सीमा संरक्षण विभागाने २७ ऑगस्टपासून भारतीय उत्पादनांवर अतिरिक्त शुल्क लागू करण्याबाबत मसूदा नोटीस जारी केली आहे. या निर्णयामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार संबंधात मोठा तणाव निर्माण झाला आहे.ट्रम्प यांनी सुरुवातीला व्यापक व्यापार युद्धाचा भाग म्हणून भारतावर २५% दंडात्मक शुल्काची घोषणा केली होती. या व्यापार युद्धात त्यांनी ९० हून अधिक देशांवर शुल्क लादले होते. त्यानंतर ३० जुलै रोजी त्यांनी आणखी २५% अतिरिक्त शुल्काची घोषणा केली.