राज्यातील महत्त्वाच्या बातम्या: कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांना मदत मिळणार का? मराठवाडा, अहिल्यानगरमध्ये पावसाने थैमान घातल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, त्यामुळे आजच्या कॅबिनेट बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच, पालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारीत होणार का, यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. दुसरीकडे, पूजा खेडकरच्या आई-वडिलांवर ट्रक क्लिनरच्या अपहरणाप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, त्यांचे कारनामे अद्यापही सुरूच आहेत.