ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर निवड करण्यात आलंय, राष्ट्रपती कोट्यातून निकम यांच्यासह चौघांची नियुक्ती करण्यात आलीय, आता सरकारी वकील उज्ज्वल निकम हे खासदार उज्ज्वल निकम असणारेयत, 2024 लोकसभा निवडणुकीत मुंबईतील उत्तर मध्य मुंबईतून लढले होते, पण उज्ज्वल निकम यांचा पराभव झाला आणि काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या विजयी झाल्या होत्या.उज्ज्वल निकम राज्यसभेचे खासदार झाल्यानं संतोष देशमुख प्रकरण त्यांना सोडावं लागण्याची शक्यता आहे, उज्ज्वल निकम हे बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारी वकील आहे, राज्यसभेची खासदारकी आणि सरकारी वकील ही दोन पदे एकत्र भूषवता येत नाहीत, त्यामुळे देशमुख प्रकरण उज्जवल निकम यांना सोडावं लागण्याची शक्यता आहे.