'मुंबईचा राजा'च्या विसर्जनाबाबत अपडेट, परवानगी नसल्यानं शुक्रवारी विसर्जन न करण्याचा मंडळाचा निर्णय

मुंबईतील प्रसिद्ध मुंबईचा राजा गणेश मंडळाच्या विसर्जनावरून नवा वाद निर्माण झाला आहे. मुंबईच्या राजाचं विसर्जन उद्या न करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. गणेशमूर्ती तराफ्याच्या माध्यमातून समुद्रात अधिक आत नेऊन विसर्जन करण्याची मंडळाची तयारी होती. मात्र या पद्धतीला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असून मंडळ आणि पोलिसांमध्ये चर्चा सुरू आहे. दरम्यान, पोलिसांची परवानगी न मिळाल्याने उद्याचे विसर्जन स्थगित ठेवण्याचा निर्णय मंडळाने घेतल्याची माहिती आहे.

संबंधित व्हिडीओ