Breaking News| Churchgate-Borivali लोकल ट्रेनमधून प्रवाशाला ढकललं, प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू

चर्चगेट-बोरिवली लोकलमधून एका व्यक्तीला ढकलून दिल्याची घटना समोर आली आहे. वांद्रे खाडीवर ट्रेन आली असताना अपंगांच्या डब्यात किरकोळ वादातून हा प्रकार घडल्याची माहिती आहे. वादातून एका व्यक्तीला धक्का दिल्याने तो धावत्या ट्रेनमधून खाली पडला. या घटनेत संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला.., त्याला वांद्रे पश्चिमेकडील भाभा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. दरम्यान, धक्का देणाऱ्या व्यक्तीला वांद्रे लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, त्याची चौकशी सुरू आहे. अपंगांसाठी राखीव डब्यात हा प्रकार घडल्याने रेल्वे परिसरात खळबळ उडाली आहे.

संबंधित व्हिडीओ