प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीसोबत एक अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. ऑनलाईन डिलिव्हरी ॲपवरून मागवलेल्या थंड पेयाच्या पार्सलसोबत चक्क एक झुरळ घरापर्यंत पोहोचल्याचा दावा श्वेताने केलाय.. या प्रकारानंतर श्वेताने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना थेट साकडं घातलं आहे. अभिनेत्री श्वेता तिवारीचा व्हिडीओ सध्या खुप व्हायरल होतोय..