रत्नागिरीच्या चिपळूण शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था झाली.अनेक वेळा अधिकाऱ्यांना सांगून सुद्धा रस्त्यातील खड्डे बुजवले जात नाहीत.महामार्गाच्या पुलाखालील साफसफाई देखील केली जात नसल्याने चिपळूण शहर भाजपाच्या वतीने राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यालयावर धडक देण्यात आली.यावेळी नगरसेविका अंजली कदम तसेच नगरसेवक शशिकांत मोदी यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. तसेच कार्यकारी अभियंता यांच्याशी नगरसेविका अंजली कदम यांनी फोनवरून चर्चा केली.खड्डे बुजवण्याचे काम जर उद्यापर्यंत सुरू झाले नाही, तर कार्यालयात येऊन आंदोलन आणि घेराव घालू असा इशारा यावेळी नगरसेविका अंजली कदम यांनी अधिकाऱ्यांना दिला.. यावेळी भाजपचे नगरसेवक शुभम पिसे यांच्यासह कार्यकर्ते रुई खेडेकर, स्वाती देवळेकर तसंच नागरिकही उपस्थित होते..