सर्वोच्च न्यायालयानं शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारांना अपात्र ठरवण्याचा निर्णय घ्यावा, असं सांगत ठाकरेंचे वकील देवदत्त कामत यांनी आज सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद केला.शिंदेंच्या आमदारांनी पक्षत्याग केला आहे की नाही, याचा निर्णय घ्यावा.... जर त्यांनी पक्षत्याग केला असेल, तर ज्या मुख्य आधारावर निवडणूक आयोगाने त्यांना ते चिन्ह दिले होते, त्यातला एक आधारच नष्ट होईल.असा महत्त्वाचा युक्तिवाद देवदत्त कामत यांनी केला. धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी कपिल सिब्बल यांच्यापाठोपाठ देवदत्त कामत यांनीही केलीय.आता ठाकरे गटाच्या वकिलांकडून सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद पूर्ण झालाय... आता या प्रकरणाची पुढची सुनावणी २ सप्टेंबरला होणार आहे. त्यावेळी शिंदेंच्या शिवसेनेकडून युक्तिवाद केला जाणार आहे.