Chh.Sambhajinagar| ग्राहक महिलांकडून तब्बल दीड किलो सोनं लंपास, शहागंज परिसरातील घटना CCTV मध्ये कैद

छत्रपती संभाजीनगरमध्ये सराफा व्यावसायिकांना हादरवणारी चोरीची घटना घडली आहे. शहागंज परिसरातील विश्वास ज्वेलर्समध्ये ग्राहक बनून आलेल्या टोळीने तब्बल दीड किलो सोने लंपास केल्याचा प्रकार समोर आलाय. दोन पुरुष आणि चार बुरखाधारी महिलांनी आधी दुकानाची रेकी केली. त्यानंतर संधी साधून सोन्याचा डबा घेऊन ते फरार झाले. चोरीची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपआयुक्तांसह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.

संबंधित व्हिडीओ