आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. होमवर्क पूर्ण न केल्याने शिक्षिकेने 6 वर्षांच्या प्रणय तेजा नावाला मारहाण केली. या मारहाणीत प्रणयचा मृत्यू झाल्याचा आरोप विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. शाळेतून घरी आल्यानंतर त्याची प्रकृती बिघडली आणि रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता, अशी माहिती मिळाली आहे. शाळेतील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, संबंधित शिक्षिका प्रणयला छडीने मारत असताना दिसले. मारहाणीमुळे घाबरल्याने प्रणय वर्गातच बेशुद्ध पडला होता असं त्याच्या पालकांनी म्हटले आहे.