सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; Tukaram Mundhe यांचा खाद्य तेलाकडे मोर्चा

दूध, पनीरसह वेगवेगळ्या पदार्थांतील भेसळीनंतर आता तुकाराम मुंढेंनी आपला मोर्चा खाद्य तेलाकडे वळवलाय.. आम्ही 'सेव्ह फूड सेव्ह ड्रग सेव्ह महाराष्ट्र' मोहिमेअंतर्गत काम करत आहोत.. असं सांगत आता FDA आयुक्त तुकाराम मुंढेंनी खाद्य तेलाचा मुद्दा हाती घेतलाय.. खाद्यतेलाबद्दल जे स्टॅण्डर्ड आहेत, त्याची तपासणी आता केली जाईल, अशी माहिती मुंढेंनी दिली. तसेच, खाद्य तेलामध्ये स्टँडर्ड तपासणीनंतर भेसळ अनियमितता प्रकारच्या काही गोष्टी सापडल्या आहेत, असंही त्यांनी सांगितलं.. खाद्यतेलाच्या वापरामध्ये नियमांचं उल्लंघन केलं तर 7 वर्षांपासून आजन्म शिक्षेची तरतूद असल्याची माहिती त्यांनी दिली.. त्याचबरोबर भेसळ केल्यास 10 लाखापर्यत दंड तर दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी 10 लाखापर्यत दंड असल्याचंही मुंढेंनी सांगितलंय..

संबंधित व्हिडीओ