आजीबाई चांगल्यात वैतागल्या,अशी काय तक्रार आहे या आजींची? त्यावर Supriya Sule यांनी काय दिलं आश्वासन?

सर्वसामान्य नागरिक आपले प्रश्न आणि तक्रारी नेत्यांकडे मांडत असतात. नेतेही शक्य होईल तसं त्या प्रश्नांची सोडवणूक करतात. काही नागरिक तर नेत्यांना जाब विचारायलाही कमी करत नाहीत. पुण्यात एका आजीबाईंनी खासदार सुप्रिया सुळेंकडे एक तक्रार करत त्यावर कारवाईची मागणी केलीय. खरं तर आजीबाईंची तक्रार ऐकून उपस्थितांना हसू फुटलं. पण सुप्रिया सुळेंनी मात्र शांतपणे आजींची कैफियत जाणून घेतली आणि त्याबाबत काही करता आलं तर नक्की करते असं आश्वासनही दिलंय. मात्र, आजीबाईंचा प्रश्न हा केवळ त्यांचा एकटीचा नाही. तर राज्यातील तमाम महिलांना भेडसावणारा असण्याची शक्यता नाकारता येत नाही... अशी काय तक्रार आहे या आजींची? त्यावर सुप्रिया सुळेंनी काय आश्वासन दिलंय... पाहूया.

संबंधित व्हिडीओ