मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मुंबईत आंदोलनासाठी दाखल होणार आहेत.त्याआधी जरांगे पाटलांनी सरकारला काल आणि आज असा दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. जरांगेंनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिलेल्या अल्टिमेटचाआजचा शेवटचा दिवस आहे.मराठा समाजाला आरक्षण द्या, जेणेकरुन मराठ्यांना मुंबईत जाण्याची गरज भासणार नाही असं म्हणत जरांगेंनी काल सरकारला अल्टिमेटम दिला. त्यानंतर आज मंत्रिमंडळ बैठक होणार आहे.. दुपारी 12 वाजता ही बैठक सुरु होईल. जरांगेंचा मोर्चा मुंबईत धडकण्याआधी सरकार आज बैठकीत कुठली पावलं उचलणार यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजची कॅबिनेट बैठक अतिशय महत्त्वाची असणार आहे. सरकार जरांगेंच्या आंदोलनावर काय भूमिका घेणार याकडे आता लक्ष आहे. दरम्यान प्रत्येक मराठ्यांच्या घरच्यांनी या मोर्चात सहभागी व्हा, असं आवाहन जरांगे पाटलांनी मराठ्यांना केलंय.