बारामती पोटनिवडणूकीचा तिढा सोडवण्यासाठी आता भाजपकडूनही पुढाकार घेण्यात आलाय... अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी NDTVमराठीला दिलीय.. भाजप नेतृत्वाकडून बारामती निवडणूक बिनविरोध कशी करता येईल यासाठी प्रयत्न सुरू असून, भाजपकडून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून काँग्रेस सोबत मध्यस्थी करण्याची तयारी असल्याची माहिती समोर आलीय..