पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी होणार असल्याची चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात दिसून येत आहे.. सत्तेत सहभागी होऊन राष्ट्रवादी काँग्रेसला उपमहापौरपद देण्याची मागणी करणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय काकडे यांनी म्हटलंय.. सध्या पुणे मानपात राष्ट्रवादी काँग्रेसकडे विरोधी पक्षनेते पद आहे.. यासंदर्भात सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि पक्षातील वरिष्ठ निर्णय घेतील पण यासंदर्भात सुनेत्रा पवार यांच्याशी बोलणार असल्याचंही काकडेंनी म्हटलं आहे.