जूनमध्ये दमदार सुरुवात करणारा मान्सून आता महाराष्ट्रात मंदावला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यातही पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडला आहे. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत सरासरीपेक्षा खूपच कमी पावसाची नोंद झालीय. पण चिंतेची बाब म्हणजे कोकणातले सिंधुदूर्ग आणि रत्नागिरीसारखे पाणीदार जिल्हेही यंदा दुष्काळाच्या सावटाखाली आहेत. पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट