संशयित दूषित कफ सिरप मुळे आजारी पडलेली कित्येक बालके मध्यप्रदेशातून आणण्यात आली असून ती नागपुरातील विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आली आहेत. त्यांना एकतर किडनी फेल्युअर मुळे डायलिसिस वर ठेवावे लागत आहे, किंवा श्वासोच्छ्वास करणे कठीण होत असल्याने व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आले आहे. यापैकी, कित्येकांना युरिया मेंदूपर्यंत पोहोचल्याने मेंदूवर सूज आली आहे. अशाच एका दोन वर्षीय रुग्णावर उपचार करणारे डॉक्टर काय सांगताहेत, पाहूया