लातूर जिल्ह्यात आरक्षणासाठी झालेल्या तिघांच्या आत्महत्या प्रकरणात आता ट्विस्ट आलाय.. या आत्महत्या आरक्षणासाठी केल्याचा दावा खोटा निघालाय... आत्महत्या करणाऱ्यांजवळ सापडलेल्या चिठ्ठ्या या इतरांनीच लिहिल्याचं आता पोलिस तपासात समोर आलंय.. अहमदपूर तालुक्यातील बळीराम मुळे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता आणि त्याच्याजवळील चिठ्ठी ही धनाजी मुळे नावाच्या व्यक्तीने लिहिल्याचे तपासात निष्पन्न झालं.. तर निलंगा तालुक्यातील महादेव कोळी समाजाच्या शिवाजी मेळळे या व्यक्तीने आत्महत्या केली होती... तर तिसऱ्या प्रकरणात चाकूर तालुक्यातील अनिल राठोड यांची देखील चिठ्ठी खोटी सिद्ध झाली... आता या तीनही प्रकरणात अहमदपूर, निलंगा आणि चाकूरमध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेत..