NDTV Marathi Special |कस्तुरबा रुग्णालयात एका पुस्तकावरून वाद, प्रबोधनकार ठाकरे हिंदूविरोधी का झाले?

विष नेमकं कुठपर्यंत भिनत चाललंय... जातीपातीचं विष, धर्माचं विष इतकं खोलवर रुजलंय की देशाची सर्वोच्च न्यायव्यवस्थाही यातून सुटलेली नाही.. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका माथेफिरू वकिलाने हल्ल्याचा प्रयत्न केला. या कृतीचा पश्चाताप सोडाच पण जे कृत्य केलं ते देवानेच करवून घेतलं असं आरोपी वकिलाचं म्हणणं आहे.. दुसरी घटना आहे.. मुंबईतल्या कस्तुरबा रुग्णालयातली.. कस्तुरबा रुग्णालयात पुस्कत वाटपावरून वाद पेटलाय. एका निवृत्त कर्मचाऱ्याने प्रबोधनकार ठाकरे यांचं पुस्तक वाटलं. यावरून सहकारी महिला कर्मचाऱ्यांनी पुस्तक हिंदूविरोधी असल्याचं म्हणत कर्मचाऱ्याचा अपमान केलाय.. या दोन्ही घटनांचा आपण आढावा घेणार आहोत सुरुवातीला पाहुयात कस्तुरबा रुग्णालयातील या वादाचा विशेष रिपोर्ट..

संबंधित व्हिडीओ