वसई, विरार आणि नालासोपारा परिसरात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. वसईच्या वसंत नगरी, मधुबन यासह विविध भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. मधुबन परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. सर्व परिसराला पुराच्या पाण्याने वेढलं आहे. अनेक वाहनं पाण्यात बुडून गेली आहेत...या सर्व परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी