सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यावर मोठ्ठा जमीन घोटाळ्याचा आरोप करण्यात आलाय.... संजय शिरसाट जेमतेम महिनाभर सिडकोचे अध्यक्ष होते... पण या वीस-पंचवीस दिवसांत शिरसाटांनी नवी मुंबईतल्या बिवलकर कुटुंबावर विशेष कृपा केली आणि त्यांना जमीन दिली..... त्यासाठी शिरसाटांनी पाच हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप रोहित पवारांनी केला..... या प्रकरणी रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सिडकोच्या मुख्यालयावर मोर्चाही काढण्यात आला... रोहित पवारांनी शिरसाटांवर आरोप केलेत, तर याच प्रकरणी संजय राऊतांनी अमित शाहांना पत्र लिहिलंय.... तर दुसरीकडे बिलवकर कुटुंबीयांनी भलतीच माहिती दिलीय.... काय आहे हे सगळं गौडबंगाल.... पाहुया...