दोन्ही शिवसेना पुन्हा एकदा एकत्र येणार का अशा चर्चांना आता उधाण आलंय.. त्याचं निमित्त ठरलं ते अंबादास दानवेंचं एक विधान.दोन्ही शिवसेना एकत्र यायला हव्या, असं दानवे म्हणाले होते.... त्याचबरोबर एकनाथ शिंदेंनी मातोश्रीवर यावं, असं आवाहन ठाकरे गटाचे नेते आणि आमदार अंबादास दानवेंनी केलंय... मातोश्रीवर गेले तर चर्चा पुढे जाऊ शकते, असंही त्यांनी म्हटलंय.. दानवेंच्या आवाहनानंतर शिंदे मातोश्रीवर जाणार का असा सवाल आता उपस्थित झालाय.