Surat ST Bus Accident| दोन एसटी बसचा भीषण अपघात; मृतांच्या वारसांना राज्य सरकारकडून 10 लाखांची मदत

महाराष्ट्राच्या लालपरीचा गुजरातच्या सूरतमध्ये भीषण अपघात झालाय.सूरत जिल्ह्यातील बारडोली येथे सूरत-धुळे महामार्गावर एसटीच्या दोन बससेची समोरासमोर धडक झाली.हा अपघात इतका भयानक होता की, धडकेनंतर एक एसटी बस थेट महामार्गावर उलटली आणि क्षणार्धात बसला भीषण आग लागली.या आगीत 8 प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला.. तर 30 प्रवाशी जण जखमी आहेत.यातील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जातीय.या दोन्ही बस सूरतमधून पालघर आणि सापुताऱ्याला येत होत्या.त्यावेळी ओव्हरटेक करताना नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.यातील एक बस ही जळगावच्या जामनेर आगारची आहे, प्रवाशांमध्ये जळगावच्या जामनेरमधील काही जण असल्याची माहिती समोर येतेय. जामनेर-सुरत बसचे चालक घनश्याम बरकले यांचा या अपघातात मृत्यू झालाय.

संबंधित व्हिडीओ