सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर जरांगेंनी आपलं उपोषण आंदोलन तुर्तास जरी मागे घेतलं असलं तरी सरकारविरोधातली टीकेची धार अधिक तीव्र केलीय. तर दुसरीकडे सरकारने जरांगेंच्या मागणीनुसार काही निर्णय घ्यायला सुरूवातही केलीय. मराठा आंदोलनादरम्यान मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना आता ST महामंडळासोबतच MIDC मध्येही नोकरी मिळणार आहे. पण त्याचसोबत सातारा गॅजेट लागू करण्याची जरांगेंची मागणी मान्य करताना सरकारची चांगलीच कसोटी लागणार आहे. पाहूयात एक रिपोर्ट..